Posted on By nirmohi.adcs@gmail.com
अभिनवमध्ये आंतरराष्ट्रीय योग डे उत्साहात साजरा 85 वर्षाच्या आजीबरोबर केली योगाची प्रात्यक्षिके
अभिनवमध्ये आंतरराष्ट्रीय योग डे उत्साहात साजरा
85 वर्षाच्या आजीबरोबर केली योगाची प्रात्यक्षिके
ऊन पावसाचा योग संगम अनुभवत ८५ वर्षाच्या आजीसोबत योगाची वेगवेगळी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी केली.
आंबेगाव बु येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभागा पासून जुनिअर कॉलेजपर्यंतच्या जवळजवळ 2590 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगा डे उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्थापक
राजीव जगताप म्हणाले कि, शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योगासन आणि प्राणायाम आवश्यक आहे.तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोगप्रतिबंधक लस आहे.जगातील सर्वात तरुणसंख्या असलेला भारत देश निरोगी होण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगाभ्यासासाठी देण्याची गरज व्यक्त केली.
आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे आज आमच्यासारख्या तरुणांना योगदिनानिमित्त केलेले मार्गदर्शन आणि जीवनातील योगाचे महत्व्व पटल्यामुळे बिघडलेले संतुलन सावरून सक्षम व्यक्तिमत्व बनण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळाल्याची भावना एन एन एस विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे आयोजन सर्व क्रीडा शिक्षकांच्या आणि इतर शिक्षकांच्या साहाय्याने केले.अष्टांग आयुर्वेद च्या नूतन कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाइव्ह विविध योग प्रात्यक्षिक आणि झुंबा यासंबंधी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप ,प्राचार्या वर्षा शर्मा,उपस्थित होते.